Showing posts with label चर्चेला प्रेरक 'गझलेचे उपयोजित छंद : शास्त्र' :शिवाजी जवरे .. Show all posts
Showing posts with label चर्चेला प्रेरक 'गझलेचे उपयोजित छंद : शास्त्र' :शिवाजी जवरे .. Show all posts

चर्चेला प्रेरक 'गझलेचे उपयोजित छंद : शास्त्र' : शिवाजी जवरे .

 



श्रीकृष्ण राऊत सरांनी त्यांचा 'गझलेचे उपयोजित छंद शास्त्र' हा ग्रंथ मला त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पुसदच्या गझलसंमेलनात दिला. त्याच्या मुखपृष्ठावरील चित्रातूनच ग्रंथाचा तोंडावळा आणि तब्येत दोन्हींची कल्पना येते. या ग्रंथाला डॉ. अविनाश सांगोलेकर यांची यथोचित अशी प्रस्तावना आहे, तर शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी मलपृष्ठावर सरांची पाठराखण केली आहे. असे काही शास्त्रीय बाड दिसले की माझ्या पोटात खड्डा पडतो, कारण कवी श्रीकृष्ण राऊत सर कुणालाही परवडतात. पण त्यांच्यातील' अकाउंटन्सी' जेव्हा कवितेचे लेखा परीक्षण करते, तेव्हा वाचकाची अवस्था जशी काहीतो 'लेजर बुक' आणि 'कॅशबुका 'तील हिशेब जुळवित आहे की काय अशी होते. केवळ हिरवी पेन्सिल आणि कॅल्क्युलेटर तेवढे नसते, बघा: सलग तीन लघु अक्षरे आलीत की, त्यातील कोणत्या दोघांची जोडी लावून त्यांच्या संयुक्त स्वरूपाला दीर्घ समजावे आणि कोणाला एकटे पाडावे याचा आपण कधी विचार वेलेला नसती, पण राऊत सरांनी त्यांच्यातही उच्चारकेंद्री किंवा आशयाधारित पद्धतीने शास्त्रीय 'फूट पाडण्या'चे राजकारण शोधून काढले, जसे की 'पटत' या शब्दात प आणिट मध्येविलंब आहे पण ट आणि त मध्ये तसा विलंब नाही. म्हणून 'पटत', 'सलग' शब्दांच्या मात्रा म्हणे' लगा' अशाच धरव्यात, त्या 'ललल' किंवा 'गाल' होणार नाहीत, 'अदृश्य' शब्दात 'अ' वर बळ पडते. म्हणून तो 'ताराप' होतो; पण अवकृपा शब्दात ' व 'वर 'कृ'चे वळ पडत नाही, म्हणून अवकृपाच्या मात्रा 'नमन गागा' किंवा 'राधिकागा' किंवा 'लल यमाचा' व्हावे का ? विविध वृत्ते वापरण्याची मराठीतील किंवा एकूणच भारतीय परंपरा सांगतांना संत रामदास किंवा दासोपंतांच्या 'पलिकडे बघण्यास आपले सामर्थ्य जात नाही. राऊत सरांनी मात्र ते टोक चाचपडत चाचपडत बेट हजारो वर्षांच्या मागे जाऊन धरून दाखविले, असाच अन्य दिशांनीही त्यांचा संशोधनाचा आवाका बघून आपण थक्क होतो.

'गज्जलांजली' आपणही वाचतो, पण आपणास जेवढ्या संदर्भासाठी वाचायची तेवढे उतरवून घेतले की आपण ती ठेवून देतो. राऊत सरांनी मात्र अत्यंत बारकाईने माधवराव पटवर्धन यांनी कसे अरबी फारसीमधील सवलती- प्रघातांना त्याज्य समजून संस्कृतमधील कर्मठपणाला स्वीकारले, याची नाजूक नोंद केली. अशा नोंदी शोधून त्यांचे टिपण करणे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुढील लोकांना ही तयार माहिती मिळते. अशा माहितीमुळे संबंधित विषयातील उपांग समजण्यास साह्य होते, लोक म्हणतात माहिती म्हणजे ज्ञान नाही आणि ज्ञान म्हणजे शहाणपणा नाही. मान्य, पण माहिती असेल तर तर्क केला जातो, त्यातून ज्ञानाची कवाडे खुलतात. निदान तर्क चालला नाही तर उत्कंठा जागून आपण कुणाकडून तरी त्याचे स्पष्टीकरण करून घेतो. माधवरावांच्या नंतर म्हणजे सुरेश भटांनी मात्र एका गुरूसाठी दोन लघु घेण्याच्या सवलतीचा, (अरवी, उर्दू, फारसीवाल्यांच्या दृष्टीने प्रघाताचा) आणि दीर्घचे लघु करण्याच्या सवलतीचाही स्वीकार केला. मात्र लघु अक्षरांना गुरू करण्याची पद्धत नाकारली.
शेवटच्या 'अ'कारी अक्षराला (निभूत ?) उगीच लांबवण्याच्या मराठी कवींच्या जुन्या पद्धतीलाही मोडीत काढले. आतर्य म्हणजे अरबी उर्दू फारसीमधील लघुचे आवश्यकता पडल्यास गुरू करण्याची सवलत भटांनी स्वीकारली नाही. म्हणजे राऊत सरांनी पटवर्धन आणि भटांच्या कामाचे महत्त्व स्पष्ट केले की, परवर्धन यांनी उर्दू, फारसी काव्यातील सवलती-प्रघातांचे मराठी वाचकांना दर्शन घडविले पण अवलंब मात्र संस्कृत शिस्तीचा केला, तर भट साहेबांनी कोण काय करते याकडे फारसे लक्ष देता लघुचे गुरू करण्याचा आपल्या मराठीतील प्रघात नाकारण्याचे सांगून एका गुरूच्या ऐवजी दोन लघु घेण्याची उर्दू फारसीमधील सवलत मान्य केली. एकीकडे आपला परंपरागत ढिसाळपणा टाळला तर दुसरीकडे वृत्तबद्ध काव्य लेखनातील जखडलेपणा काहीसा दूर केला.
उर्दू, फारसीतील 'हरफ गिरा देना' (वर्ण लोप) हा प्रकार मात्र मराठी रसिकांसाठी, कवीसाठी काहीसा न पटणाराच प्रकार आहे, तोही राऊत सरांनी छान विषद केला आहे. प्रारंभी ते आले आहेच की, सरांनी अत्यंत बारीक बारीक जागा या ग्रंवात उलगडून दाखविल्या आहेत. त्यातील हेमंत पुणेकर यांच्या ज्या द्विपद्या आहेत, त्या योग्य की अयोग्य हे ठरविण्याचा आपला अधिकार नाही, पण ते दोष आहेत असे मानले तर ते टाळून तेवे पर्याय काय निवडता आले असते याची थोडीशी चर्चा-"पुन्हा जन्मली ही मनात एक आशा बघूया पुढे काय होतो तमाशा" या ओळीचे वाचन

"पुन्हा जन्मली ही 'मनातेक' आशा बघूया पुढे काय होतो तमाशा"

अशा पद्धतीने करावे आणि त्याला 'भुजंग प्रयात' समजावे असे म्हटले. म्हणजे लिहितांना 'ए' चे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायचे पण उच्चारतांना त्याला 'त' चीमात्रा म्हणून एखाद्या दासी-बटकीसारखे वापरणे मनाला पटत नाही. हा आपल्यावरील प्रदीर्थ प्रभावाचा (इये संस्कारांचा असेही वाचू शकता) परिणाम असू शकतो, वरील ओळीत कवीला: "नवी जन्मली ही मनी एक आशा" किंवा -

"नवी जन्मली ही पुन्हा एक आशा"

असे करता आले असते, आशा म्हटली की तीमनातच उद्भवते. त्यामुळे 'मनात' या शब्दाची अनावश्यक उधळपट्टी कशाला ? कवितेच्या अर्थशास्त्राचे तेच तर वैशिष्ट्य आहे की, अनावश्यक शब्दासाठी मात्रा खर्च करू नये, विशेषतः गैय काव्यात आशय बाधित न करणारे पर्याय शोधून आपण गेयतेच्या बंधनांचे कुशलतेने पालन करणे अपेक्षित असते, लिहिलेल्या मात्रा वाचू नका, उच्चारू नका, म्हणजे भाजीपाल्याचे पैसे देतो पण निंबू तसेच द्या, अशा सवलती घेतल्या तर मग हा प्रकार मुक्त कवितेसारखा झाला, जी ओळ लिहिली, ती लिहिली! काम खलास ! आणि हो,
'बधू' दीर्घ असते पण त्याला' या' प्रत्यय जोडल्यावर 'बघुया' व्हावे, हा भाग तर निराळाच आहे, असो. 'हरफ गिरा देना' या प्रघाताचे उदाहरण सरांनी साहिर चे एक फिल्मी गीत, जीगझलच आहे, बघाल तर त्यात 'मैं', 'की', 'तो' या दोन मात्रा असलेल्या लिखीत वर्णांना एकच मात्रा समजून उच्चारायचे... असे आहे. ते एकवेळ स्वीकारार्ह वाटते. असे उदाहरण कैफी आझमीचेही आहे-

"मैं ये सोच कर उस के दर से उठा था किवी रोक लेगी मना लेगी मुझको"

वरील ओळीत 'मैं' आणि 'के' दोन्ही गुरूंचा उच्चार लघु करावा लागतो. पण यात हरफ कुठे गाळला? मात्रा घटवली. हे असे मात्रा घटवणे पटणारे आहे मात्र,

"स्टेशन आले की तो उतरणार कोण कुणाच्या सोबत असतो ?"

वरील पहिल्या ओळीत 'उतरणार' असे लिहायचे आणि त्यातील अंतिम 'र' धरू नका म्हणायचे म्हणजे "जेवणाने देयक देतो पण लस्सीचे पैसेत्यात लावूनका," असेच म्हणण्यासारखे आहे. त्याऐवजी तुम्ही थोडे यांबून पर्याय शोधा, पर्याय म्हणून स्वस्त असा मट्ठा घ्या, हेच तर गेय कवितेचे वैशिष्ट्य असते, कारण आमची अशी धारणा आहे की-

"अनंत भांडार मायबोलीत साठलेले
हवेतसे काफिये इथे आयतेच होते"

त्यामुळे, ती ओळ -

"स्टेशन आले की तो उत्तरतो कोण कुणाच्या सोबत असतो?"

- अशी करता आली असती, थोडे थांबून विचार केला तर आपणास जे म्हणायचे ते वरीलप्रमाणेन पटणाऱ्या सवलती टाळून सफाईदारपणे म्हणता येते. इतक्या न पटणाऱ्या सवलती घेऊन गझल लिहिणे म्हणजे कवीच्या घाईमुळे जणू त्या भाषेतील शब्द मांडाराचे दैन्य दाखविणे होय, एखाद्या उतावीळ मुलाने कच्ची भाजी ताटात घेऊन इतरांना अप्रत्यक्षपणे त्याची आईच नीट स्वयंपाक करीत नाही असे दाखविणे होय, बघा, मातृभाषेचाच नव्हे कोणत्याही भाषेचा नीट शब्द निवडून अर्थवाहीपणे वापर केला तर ती भाषा समृद्ध आणि अर्थवाही दिसून येते. आणितसे न करता चुकीचे प्रत्यय लावून, अपेक्षित नियम न पाळून बेंगरूळ पद्धतीने लिहिले-बोलले तर त्या भाषेला उणेपणा येतो.

चांगली पर्यायी क्रियापदे, विशेषणे असतांना भलत्या शब्दांचा वापर करून आशयाच्या, काव्यगुणवत्तेच्या आणि व्याकरणी नियमांच्या दृष्टीने विकृत ओळी का लिहाव्यात? घरात विळा, चाकू, पावशी असूनही कुहाडीने कांदे चिरणाऱ्या माणसासारखी ही दरिद्री लक्षणे कशाला? मराठीत असे होऊ नये, असे नाही. हे कोणत्याही भाषेत होऊ नये, जसे की राऊत सरांनी निदा फाजली यांच्या गझलेचे दिलेले उदाहरण बघा:

"हर तरफहर जगह बेसुमार आदमी फिर भी तन्हाईयों का शिकार आदमी" वरील रचनेत :

'हर तरफ', 'हर जगह', 'बेशुमा', '(र) आदमी' अशा प्रकारे चारवेळा 'गालगा' आलेले आहे. पण शेवटच्या 'गालगा' च्या आधी एक मात्रा असलेला 'र' अधिकचा आला त्याने वृत्ताचा नियम भंग झाला पण उर्दूवाले म्हणतील 'रआदमी'चा उच्चार 'रादमी' असा करायचा, पण-

"स्टेशन आले की तो उतरणार' यातील 'र' कशात घालणार ? घशातच दाबणार तर तो शब्द 'उतरणा' असा होतो, त्याला काही अर्थ उरत नाही, म्हणून एखादे व्यंजन शब्दात किंवा ओळीत कुठे आले त्यावरून त्याचे गाळणे स्वीकारार्ह की स्वीकारार्ह ठरायला हवे. माहिती मिळाली की तर्क सुचतो, याची प्रचितीबया:

हेमंत पुणेकर यांचे'... मनात एक आशा' आणि निदा फाजली यांचे : '... शिकार आदमी' या दोन्ही ठिकाणीव्यंजनानंतर स्वर आला म्हणून तोत्या व्यंजनात विरघळून जातो, तेथे ' मनात दोन आशा' म्हणून बघा काय होते आणि'... शिकार बच्चे', '....

बेशुमार खवातीन' असे लिहाल तर वाचतांना सुद्धा काट्यावर पाय पडल्यासारखे वाटतेना ?

केवळ ओळीच्या शेवटी अधिकचा 'अ'कारांती वर्ण आला तर चालतो; असा नियम किंवा सवलत असली तरी ते काव्याच्या रसवत्तेला बाधा आणणारी आहे म्हणून तिला स्वीकृती देणे जड जाते. मी आणि माझ्यासारख्या हस्व डोक्याच्या लोकांनी याआधी कधी यावर विचारही केला नसेल, हा राऊत सरांनी घेतलेल्या काचा हा परिपाक आहे. म्हणून मी वर म्हटले की, माहिती जरी ज्ञान नसले तरी माहितीमुळे ज्ञानाची द्वारे उघडतात, तर्क करण्याची अग्रे टोकदार होतात.
राऊत सरांनी नंतर लगेच पाचव्या नियमात (पृष्ठक्र. १२३) शब्दाचे शेवटचे अक्षर आणि एकाक्षरी शब्दातील मात्रा घटवूनये; शहराच्या, व्यक्तीच्या नावात मात्रा घटवूनयेत, म्हणजे त्यांना हस्व वगैरे करू नये... यासंबंधी सर्वनियम धुंडाळून संकलित केले आहेत, माझी तर अशी धारणा आहे की, सर्वनामातील मी, ही, ती, तू... यांनाही हस्व वगैरे
करण्याच्या उचापती करू नयेत, कारण सर्वनामांची जी विशिष्ट ओळख आहे; ती आपण लेखनात त्यांच्या मात्रांसह जपली पाहिजे, उच्चारात काय गोंधळ घालायचा तो घाला .

काफियाची संकल्पना या प्रकरणात सरांनी ही एक सवलत स्पष्ट केली की, उर्दू फारसी वृत्तात जोस्वरवारसा म्हणजे अलामत असते, ती उह अ अशी एक मात्रेची असेल तर भित्र उच्वारांची असली तरी चालते, त्याची उदाहरणे देतांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे खालील पद दिले

"जाहले आभार भारी आपुले काल हस्तातूनि माते रक्षिले धन्य मातापितर साचे धन्य जे पुत्ररत्ना सर ऐशा प्रसवले'

यात प, क्षि आणि व यांचा उच्चार 'उ'कारी, 'इ'कारी आणि 'अ'कारी असा वेगवेगळा आहे. म्हणून त्याला बहुस्वर काफिया म्हणतात तशीच सुरेश भटांची गझल आहे-

"हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी तूच नाहीस ड्ये हात धरायासाठी" वर फि आणि ध यांचे उच्चार 'इ'कारी आणि 'अ'कारी आहेत, हा उच्चाराच्या दृष्टीने एकप्रकारे दोषच आहे पण तो स्वीकृत आहे. एकस्वर काफिया असलेल्या रचना सर्वसामान्य आल्याने त्यांची उदाहरणे देण्याची आवश्यकता नाही.

जूल काफिया : हा प्रकार म्हणजे अनेकदा अलमतीच्या आधी समान उच्चारांचे शब्द येतात, म्हणजे दोन काफिये असलेली गझल तयार होते. कालिदास चवडेकर यांची रचना तशी आहे-

"वाकुनी पाहते एक खिडकी जुनी
मोहुनी टाकते एक खिड़की जुनी"

वर बघाल तर 'वाकुनी' नंतर 'पाहते' तसेच 'मोहूनी' नंतर 'टाकते' असे दुहेरी काफिये आले आहेत. काफियांची पुनरावृत्ती असलेली उदाहरणे देऊन राऊत सर म्हणतात की, एकच काफिया परत येऊ नये असेही कुठे सूचित केलेले नाही आणि तो पुनरावृत्तीने यावा असेही अपेक्षित नाही. पण काफियाची पुनरावृती अल्पसा का होईना बेरंग करती, हे गझल वाचतांना तर जाणवतेच, अपवाद हा कीती शब्द वेगवेगळ्या अथनि आला तर खटकत नाही. देऊन स्पष्टीकरणही दिले आहे, तसेच मतल्यातील काफिये सारख्या वर्णाचे, पण पुढे मात्र काफियातील वर्ण बदलतो जसे की 'आधार' आणि 'धार' हे काफिये मतल्यात आल्यावर नंतरच्या शैरात मात्र झुंजार, तलवार यावेत,

'वृत्ताचे वर्गीकरण ' हे प्रकरण म्हणजे एक भंडार आहे. मात्रेनुसार गण पाडण्याचे तसेच तीन एककऐवजी अधिक एकक घेऊन गणांची विभागणी त्यात करून दाखवली आहे, या ग्रंथाच्या वाचनाने नवोदित कवी जरा अधिक आत्मविश्वासाने गझल लेखन करू शकेल, कारण सरांनी दिलेली उदाहरणे पाहून त्याला स्वतः ला मोकळे झाल्यासारखे वाटेल हे महत्त्वाचे आहे. या ग्रंथात गझलेच्या तांत्रिक अंगाने विचार करता, काहीच सुटलेले नाही. छोटी वृत्ते, मध्यम वृत्ते आणि मोठी वृत्ते वापरतांना कसकता अडचणी येतात, दोष उद्भवण्याची शक्यता असते, हेही अनुभवातून लेखकाने सांगितले, जर गझलविषयी अभ्यासक्रमाचा किंवा परीक्षांचा विचार झाला तर विद्यार्थ्यांना या ग्रंथातून जवळपास संपूर्ण साहा होऊ शकते, राऊत सरांनी येत्या पिढ्यांसाठी हे एक मौलिक काम करू ठेवले आहे. समकालीन आणि भावी पिढयांच्या वतीने मी त्यांचे, या मानेचा काटा दिला करून केलेल्या कामासाठी ऋण मानतो. कारण हा ग्रंथ जसा चर्चेला प्रेरक आहे, तसाच तो अभ्यासाला पूरक आहे. सोबतच हिंदी उर्दूच्या तुलनेत मराठी गझल कुठे ? हा विषय वरचेवर चर्चेला येतो. त्यात मराठीची रचना वैशिष्ट्यांच्या दृष्टीने तांत्रिक धारणा काय ? असे विचारले तर तसे डॉ. राम पंडित, वैभव वसंतराव कुलकर्णी, (प्रस्तुत लेखकाचे गझल चर्चा) आणि इतरांनी या दिशेने काम केले आहे, त्यापलिकडे राऊत सरांचा हा विस्तृत वेगळा एक ग्रंय जोडीला हाती घेऊन मराठी माणूस उभा राहिला की, तो मराठी गझलची तांत्रिक मीमांसा कुठे आहे ? या हल्ल्यासमोर एक उत्तम ढाल सिद्ध होऊन इतर भाषी लोकांचे कोणतेही प्रहार यशस्वीपणे परतवून लावीन, यात मला तरी अर्ध्या मात्रेचीही शंका नाही.
● ● ●

उद्याचा मराठवाडा'

दि.२३ ऑगस्ट २०२६

नक्षत्र पुरवणी

● ● ●