'सप्तरंग ' सकाळ, पुणे
दि. ८ मार्च २०२६
गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र
'गझल' शब्द ऐकला तरी अनेकांच्या मनात हळूवार भावनांचे तरंग उमटतात. गझल केवळ वाचून नाही, तर समजून घेणे आवश्यक असते. ती समजल्यावर त्यातील भाव नेमकेपणाने पोहचतो. गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र' या पुस्तकात गझलचे विविध अंग अत्यंत प्रभावीपणे उलगडले आहेत. गझलेमधील पारिभाषिक संज्ञांचे अर्थ दिले असून, संस्कृत, अरबी-फार्सी अरूज यांचे तुलनात्मक विश्लेषण बारकाईने केले आहे. गझलेच्या वृत्तांचे वर्गीकरण, त्यामधील लवचिकता समजावून सांगितली आहे. अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेल्या विश्लेषणामुळे गझलेबद्दल अधिक आत्मीयता निर्माण होण्यास मदत होते. वैशिष्ट्य : गझलेचे व्याकरण समजून सांगणारी मांडणी.
प्रकाशक : स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे
पृष्ठे : २७६,
मूल्य : ४०० रु.


No comments:
Post a Comment